Pune News : पुणे, ता.२९ : कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला सुमारे ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी कात्रज परिसरात जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पाठविण्यात जात असल्याची माहिती दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली होती. आणि कात्रज चौकात पनीर वाहतूक करणारा टेम्पो थांबला आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून टेम्पोचालकाला ताब्यात घेतले होते. Pune News
दहा लाख रुपयांचे पनीर जप्त ….
दरम्यान, टेम्पोतून दहा लाख रुपयांचे चार हजार ९७० किलो पनीर जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांना ही माहिती कळविली होती.
त्यानंतर हा भेसळयुक्त पनीर बाणेर येथील नॅशनल ॲग्रीकल्चर अँड फूड ॲनलसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (नाफरी) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीत पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आला आहे. Pune News
हि कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक- १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलिस अंमलदार सुमीत ताकपेरे, महेश पाटील यांच्या पथकाने केली. Pune News