Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात घरफोडयांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस चोरट्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास बेड्या ठोकण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे.
तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस दीडशे घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या मागावर होते. तो सतत पोलिसांना चकवा देत होता. अखेर तो पुणे पोलिसांच्या सापळ्यात अडकलाच. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४०, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३७ तोळे वजनाचे २२ लाख २० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत असताना आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला कोंढवा पोलिसांनी पकडले आहे. त्याच्यावर दीडशे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यात तो अडकला. कल्याणी याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कल्याणी याने फक्त पुणे शहरात घरफोड्या केल्या की इतर ठिकाणी केल्या, हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.