Pune News : पुणे : पुणे शहरातून दररोज महिला अत्याचाऱ्याच्या घटना समोर येताना दिसून येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार ही गंभीर बाब आहे. असे असताना पुन्हा एकदा शरातील चंदननगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आत्महत्या करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 16 वर्षीय मुलगी गर्भवती राहीली त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेम केले नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी देत हे कृत्य आरोपीने केले आहे. (Abuse of a minor girl saying she can’t live without you)
याप्रकरणी पिडितेच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशन थोराजी पतंगे (वय २५, रा. वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची 16 वर्षीय मुलगी व आरोपी या दोघांची ओळखी होती. दरम्यान, आरोपी किशन याने पिडित मुलीला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू जर माझ्याशी प्रेम केले नाही तर मी माझे जीवाचे बरे वाईट करील, असे म्हणून तिला भिती दाखविली. (Pune News) शिवाय तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले व तिच्यासंमतीशिवाय व इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. यामध्ये मुलगी ही गर्भवती राहिली त्यामुळे हा प्रकार सर्वांच्या समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! घोरपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल
Pune News : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावे पुन्हा बनावट फेसबूक अकाऊंट