Pune News : पुणे : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपये रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याबाबतचे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.
उमेश भिमराव इंगळे (वय २० रा. अण्णाभाऊ साठे नगर, पाण्याच्या टाकीजवळ, बागलबुवा मित्र मंडळा शेजारी अप्पर, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News) तर निजाम अजगर हाश्मी (वय १९, रा. अण्णाभाऊ साठेनगर, झांबरे शॉपजवळ, इंदिरानगर, बिबेवाडी, पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बसवराज शिवराज उजणे (वय ३५, पोलीस नाईक) यांनी सरकारच्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक उजणे हे कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीमशीन भागात मार्शल म्हणून पेट्रोलिंग करत होते. उजणे हे कर्तव्य बजावत असताना, कोंढवा येथील राजपाल बिल्डर यांच्या मोकळ्या प्लॉटच्या जवळ असलेल्या कंपाऊड लगतच्या खड्यात एक अनोळखी तरुणाचा
डोके नसलेल्या व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. (Pune News) या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी तातडीने धाव घेतली आणि पोलिसांनी केलेल्या तपासात या तरूणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उजणे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणाचा पोलिसांनी तपास करून ओळख पटविली असता हा मृतक उमेश भिमराव इंगळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्हाचा तपास केला असता, हा गुन्हा आरोपी निजाम हाश्मी याने केल्याचे निष्पन्न झाले. (Pune News) पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून इंगळे याचा खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांना कोंढवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले, सहाय्यक फौजदार महेश जगताप, पोलीस नाईक अंकुश केंगले, पोलीस अंमलदार रिकी भिसे यांची मदत मिळाली.
न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात या गुन्ह्याचा खटला सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व एक लाख रुपये दंड, व दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करण्याचे आमिष दाखवून फसवणूक!
Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
Pune News : पीएमपी बसचे गणेशोत्सवात ‘रेकॉर्ड ब्रेक’ उत्पन्न..