Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : लोणी काळभोर येथील महिलेची “तनिष्क शोरूम” कडून तब्बल ३ कोटी ४८ लाखांची फसवणूक, एकाला अटक, शोरूमच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 July 2023, 13:16

Pune News : पुणे : कमी किंमतीचे हिर्‍याचे दागिने जास्त किंमतीला देऊन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका महिलेची तब्बल ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केल्याची घटना एका नामांकित शोरूममध्ये घडली आहे. लक्ष्मी रोडवरील उंबर्‍या गणपती चौकातील तनिष्कच्या शोरुममध्ये हि घटना घडली आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे. त्यानुसार शोरूमच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सेल्समनला अटक करण्यात आली आहे.

संगिता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल महेता, शोरूमचे मालक हितेश पुनामिया अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चेतन विसपुते याला अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर येथील एका ४६ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पेट्रोल पंप व इतर व्यवसाय आहेत. त्यातून मिळणार्‍या पैशांमधून त्यांनी डिसेबर २०१८ पासून तनिष्कच्या लक्ष्मी रोडवरील शोरुममधून वेळोवेळी ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्‍यांचे दागिने खरेदी केले होते. यावेळी त्या नेहमीच्या ग्राहक असल्याने त्यांनी डिस्काऊंट मागितल्यावर तेथील मॅनेजर, कॅशिअर यांनी त्यांना डिस्काऊंट दिला होता.

जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी हे हिर्‍याचे दागिने बदलून दुसरे दागिने घेण्यासाठी शोरुममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून दागिने न बदलण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी फोन केले. तरी त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

तेव्हा त्यांनी तनिष्कच्या दुसर्‍या शो रुममध्ये हे हिर्‍याचे दागिने दाखविले. तेव्हा त्या शो रुममधून त्यांच्याकडील हिर्‍याचे दागिने हे प्रत्यक्षात अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना कमी किंमतीचे हिर्‍याचे दागिने जास्त किंमतीत दिले. जादा रक्कमेचे बनावट बिल तयार करुन त्यावर तनिष्कचे शिक्के मारुन डिस्काऊंट दिल्याचे भासविले.

दरम्यान, अशा प्रकारे ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्‍याचे दागिन्यांचे वेळोवेळी बिले देऊन प्रत्यक्षात ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. शोरुममधील मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि मालक यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करुन मुख्य सेल्समनला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करीत आहेत. Pune News

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

Yawat News : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ अट्टल गुन्हेगार तडीपार - पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.