Pune News पुणे : शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे. (Pune News) ही घटना जून २०२३ ते रविवार (दि. १०, जुलै) यादरम्यान घडली आहे. (Pune News)
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा आरोपीने पाठलाग केला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने तिला मी तुला लाईक करतो असे म्हणून खडकवासला येथे नेले.
दरम्यान, आरोपीने पिडीत मुलीला शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले. आणि तिच्यासोबत शाररीक संबंध ठेवले. ही घटना जून २०२३ ते रविवार (दि. १०, जुलै) यादरम्यान घडली आहे. अशी फिर्याद पिडीत मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.