Pune News पुणे : देव-दानव युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या कोयाळी (ता. खेड) येथील श्री भानोबा देवाच्या अंगावरील नोटा काढून घेतल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ऑक्टोबर २०२२ ते ५ मे २०२३ या दरम्यान घडली आहे. (Pune News)
याप्रकरणी बाळकृष्ण तात्याबा कोळेकर (वय-५३, रा. कोयाळी चाकण) यांनी सोमवारी (ता.२४) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबन महादू कोळेकर (वय-६०), सिताराम महादू कोळेकर (वय-६५), दत्तात्रय विठोबा कोळेकर वय-६०, सर्व राहणार. कोयाळी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील वर्षभरात कोणाच्याही परवानगीशिवाय श्री भानोबा देवाच्या समोरील व अंगावरील पन्नास व शंभर रुपयांच्या एकूण २ हजार ७०० रुपयांच्या नोटा घेतल्या आहेत. अशी फिर्याद बाळकृष्ण कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर आळंदी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.