Pune News : डॉक्टर पत्नीची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह एकावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा व त्यांचा भाऊ राजीव कस्तुरीलाल लुथरा (रा. ए/२०३, मारवल प्लाझा, एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व डॉ. अमित यांचा २० मे २०११ रोजी विवाह झाला होता.
या विवाहामध्ये पत्नीकडून होंडा सिटी कार, १० तोळे वजनाचे एक बिस्किट असे एकूण १५ सोन्याचे बिस्किट, ०२ किलो चांदीचे भांडे, ०५ तोळे सोन्याची चैन व हिऱ्याची अंगठी देऊन एक करोड रुपये रकमेच्या वस्तुंची मागणी करत त्या स्वीकारून पतीने सदर विवाह केला होता.(Pune News)
त्यानंतर नवीन व्यवसायासाठी पत्नीचे माहेरून ५० लाख रुपये मागून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर व्यवसायासाठी मागितलेल्या पैशांचा हिशोब मागितल्यावर पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घरातून निघून जाण्यास सांगितले.(Pune News)
याबरोबरच सोबत सुरू केलेल्या लाईफ बेरीज हेल्थ प्रा. लि. कंपनीचे दवाखान्यातील पत्नीच्या रक्कमांचा अपहार करून तिच्या बनावट सह्या करून पतीने तिची फसवणूक केल्याची फिर्याद डॉ. अमित लुथरा यांच्या पत्नीने दाखल केली आहे.