Pune News : भूमिगत विद्युत वाहिनीची कल्पना न मिळाल्याने खोदकाम करत असलेल्या कामगाराला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ जुलै) दुपारी चार वाजताच्या सुमारास पुनावळे येथील कोयते वस्ती येथे घडली.(Pune News)
दोघांवर गुन्हा दाखल.
गोपाळ आय्याळी (वय २१, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी रवी बजलवार (वय २५, रा. बिजलीनगर) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघेरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), सिद्धेश तांडेल (२७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा गोपाळ सोमवारी कोयते वस्ती येथे खोदकाम करीत होते. त्या वेळी आरोपींनी गोपाळ यांना भूमिगत विद्युत वाहिनीची माहिती दिली नाही. त्यामुळे खोदकाम करताना विजेचा धक्का लागून गोपाळ यांचा मृत्यू झाला.(Pune News)