Pune पुणे : सासूच्या सततच्या छळाला कंटाळून आणि मानसिक त्रास नकोसे झाल्याने विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार ताडीवाला रोडवरील दुष्काळ झोपडपट्टीत ११ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला.
राजश्री कांबळे (वय २५, रा. ताडीवाला रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शकुंतला शिरसैल दिड्डीमणी (वय ५०, रा. कृष्णानगर, महमदवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नागम्मा चन्नाप्पा कांबळे (वय ५०, रा. ताडीवाला रोड) हिच्यावर बंडगार्डन पोलिसांनी सासूवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी यांची मुलगी राजश्री कांबळे हिची सासू किरकोळ कारणावरुन वारंवार त्रास देऊन घालून पाडून बोलत असे. तिचा मानसिक छळ करुन तिचे जगणे नकोसे केले होते. फिर्यादी यांच्या मुलीने शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.