पुणे : पुण्यामध्ये एक धक्कदायक बाब समोर आली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना हेरून, त्यांना लक्ष्य करायचे. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना घरी न्यायचे.चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध करायचे आणि त्या महिलांना लुटायचे. अनेक महिलांना अशा प्रकारे लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांना हेरून, त्यांना लक्ष्य केलं जात असे. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना घरी न्यायचे. चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध करायचे आणि त्या महिलांना लुटायचे. अनेक महिलांना अशा प्रकारे लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफा शकेला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे. याप्रकरणात एक महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या आरोपींकडून २ लाखांहून अधिकचे सोन्याचे दागिने मोटार सायकल, मोबाईल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणाबाबत फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 12 जून रोजी संबंधित महिला भारत ज्योती बसस्टॉप बिबवेवाडी येथे उभी असताना पीडित महिला त्यांना भेटली. काम देण्याचा बहाणा करून ती फिर्यादी महिलेला लक्ष्मी रोड येथील घरी घेवून गेली. तिथे आरोपी महिलेने तिला चहामधून गुंगीचं औषध दिलं आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी महिलेने तिच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून घेतले, तसेच मोबाईल हिसकावून घेतला.
त्यानंतर पीडित महिलेला रात्री १० च्या सुमारास फुरसुंगी येथे बेशुध्द अवस्थेत सोडून दिले. दागिने व मोबाईल लुटल्यामुळे पीडित महिला खूप घाबरली. तिने बिबवेवाडी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर गुन्हयातील २ लाख ४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोटर सायकल, मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. याचा अधिक तपास सुरू असून, अशीच घटना आणखी कोणासोबत घडली असेल तर त्यांनी पुढे यावे आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात संपर्क करावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे हे करत आहेत.