Pune Fraud | पुणे : एका कंपनीमध्ये गुंतवणुकी केल्यास दीडपट परताना देण्याचे आमिष दाखवत तब्बल ८८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष लक्ष्मण लिमण (वय ३७) आणि त्याची पत्नी अक्षता (वय ३५, रा. समर्थ निवास, गुरुदत्त काॅलनी, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत संतोष तुकाराम कोंढाळकर (वय ४०, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लिमण यांनी टीएसपीएएन प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखविले होते. कोंढाळकर आणि त्यांच्या मित्रांनी लिमण यांच्या कंपनीत ८८ लाख १४ हजार रुपये गुंतवले होते.
लिमण दाम्पत्याने त्यांना परतावा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी कोंढाळकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोंढाळकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Fraud | मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक ; कोथरूड परिसरातील घटना..