Pune पुणे : मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी खाकी गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतया तरुणाला चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी) असे तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. औंधमधील नागरस रोडवरील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक व त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले. तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता त्याने औंध चौकीला पोलीस असल्याचे पोलिसांना सांगितले.
आपल्याच हद्दीतील चौकीत नेमणूकीला असलेल्या आपल्याला माहिती नाही. त्याचा गणवेश जरी पोलिसांचा असला तरी पायात चप्पल होती. खाकी ड्रेसच्या खांद्यावर म.पो. आणि कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते. ते पाहिल्यावर तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असून मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा गणवेश घातला असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता तोपोलीस हवालदार कापरे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune : जागतिक वाहतूक कोंडीत पुणे सहाव्या क्रमांकावर,कारणांमुळे पुण्यात वाढली वाहतूक कोंडी
Pune Fire : पुण्यात मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ दुकाने जळून खाक ; तर दोन जण गंभीर जखमी