Pune पुणे : गाडीला काळ्या काचा लावून फिरणाऱ्या एका तोतया पोलिसाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो तोतया असल्याचे चौकशीत निष्पन झाले आहे. ही घटना अलका टॉकिज जवळील टिळक चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
ओमकार विलास धर्माधिकारी (वय ३२, रा. मु. पो. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाजीराव पाडळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
पोलीस शिपाई सागर पाडळे व त्यांचे सहकारी टिळक चौकात वाहतून नियंत्रण करीत होते. त्यावेळी टिळक चौकातून केळकर रोडला एका ईटीस कारला काळ्या काचा लावलेल्या दिसून आल्या. तेव्हा पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याने मी पोलिस आहे. माझ्यावर कारवाई करु नका, नाही तर तुम्हाला महाग जाईल अशी धमकी दिली.
दरम्यान, बोलण्या -वागण्यावरुन व त्याच्या पेहरावावरुन तसेच त्याचे वाढलेले केस व दाढी यामुळे पोलिसांना तो पोलीस नसल्याचा संशय आला. त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्याने सातारा पोलिसाचे ओळखपत्र दाखविले. त्यावर युनिफॉर्ममध्ये फोटो होता. ते ओळखपत्र पाहताच ते बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.