(Pune Crime ) राजगुरूनगर, (पुणे) : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन तक्रारदारांमध्ये वाद होऊन पोलिस ठाण्यातच एका तरुणावर गंभीर वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १४) दुपारी ही घटना घडली आहे.
क्षितिज बाबाजी दांडगे (रा. दोंदे ता. खेड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वैभव गोविंद बोऱ्हाडे (रा. दोंदे ता. खेड) असे वार केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोंदे (ता. खेड) येथे दोन कुटुंबामध्ये वाद होऊन सोमवारी हाणामारी झाली होती. यावेळी वैभव बोऱ्हाडे याच्या पत्नीला मारहाण झाल्यामुळे ते तक्रार देण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात आले होते. त्याचवेळी क्षितिज दांडगे हा देखील तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी दोंघा तक्रारदारांना एकत्र बसवून ठेवले होते.
दरम्यान, झालेल्या प्रकराणावरून दोंघामध्ये पुन्हा पोलिस ठाण्यात बाचाबाची झाली. राग अनावर होऊन वैभव बोऱ्हाडे यांने खिशातील ब्लेड काढून दांडगे यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात दांडगे गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध ; रवींद्र धंगेकर
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल!