Pune Crime पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत बेड्या ठोकल्या.
मोतीलाल रेडीअप्पा पवार (वय २१) आणि देवराज उर्फ कृष्णा शंकर पवार (वय २२, रा. दोघेही कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून अडीच लाख रूपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पुणे रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफने ऑपरेशन यात्री सुरक्षा अभियान सुरू केले आहे. पुणे स्टेशन येथे सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील आरोपींचा शोध आरपीएफ कडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घेण्यात येत होता. त्यावेळी सोनसाखळी चोरणाऱ्या एका आरोपीची ओळख पटविण्यात त्यांना यश आले.
मंगळवारी (ता. ०४) रोजी आरपीएफ जवानांना गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना त्यामधील एक आरोपी रेल्वे परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. आरपीएफचे सहाय्यक उपनिरिक्षक संतोष जायभाये यांच्या पथकाने एकाला पकडले. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव मोतीलाल पवार असल्याचे समजले. त्याने त्याचा साथीदार देवराज उर्फ कृष्णा शंकर पवार याच्या मदतीने यापुर्वी पुणे रेल्वे स्टेशन येथे चार चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
दरम्यान, या आरोपीकडून दोन लाख ५५ हजार ३०० रूपयांचे दागिने जप्त केले आहे. पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे आणि वरिष्ठ सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार यांनी आरोपींना पकडणाऱ्या पथकाचे कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पुण्यातील; या पोलीस चौकीवर दारुड्याने केली दगडफेक ; आरोपी अटकेत!
Pune Crime : शेजाऱ्याने पत्नीला दुचाकीवरून घरी सोडले; ते पतीने पाहिले आणि मग..