Pune Crime : पुणे : पुर्वीच्या भांडणातून दोन जणांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील महर्षीनगर भागातून समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. (Two were stabbed with a sharp weapon out of animosity; Incident at Maharshinagar in Pune)
याप्रकरणी मंदार बाळु गायकवाड (35, रा. 12/96, महर्षीनगर, राधाकृष्ण मंदिराजवळ, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime) त्यावरून चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
एकजण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार आणि त्याचे मित्र रोहन काकडे, आशिष बडदे महर्षीनगर परिसरात थांबले होते. हे सर्व मित्र मोबाईलवर आयपीएल क्रिकेट मॅच बघत होते. (Pune Crime) आरोपी सार्थक याचा मंदारशी वाद झाला होता. त्या जुन्या भांडणातून आरोपींनी मंदार याच्या हातावर कोयत्याने वार केला. याशिवाय मंदार यांचा मित्र सतिश काकडे यांना लाथा-बुक्क्यांनी व बांबुने मारहाण केली. मंदार यांचे दुसरे मित्र रोहन काकडे यांच्या पाठीवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या रोहन याच्यावर कोयत्याने वार करून आरोपी सार्थक आणि साथीदार पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.