Pune Crime | पुणे : ट्रॅव्हलसने ड्रग्ज घेऊन येणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली. आरोपींकडून सुमारे सव्वा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय 35, रा.अलोट जिल्हा रतलाम, मध्य प्रदेश), आझाद शेरजमन खान (वय 35) राहणार पिंपळखेडी तालुका अलोट जिल्हा रतलाम, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. तर तिसरा आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे वय वर्ष16 आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शनिवारी रतलाम येथून एमडी हे ड्रग्ज घेऊन ट्रॅव्हल्सने खराडी बस स्टॉपला उतरले. त्यावेळी अल्पवयीन आरोपी त्यांची वाट बघत थांबला होता. त्यानंतर तिघे आरोपी खराडीतील बस स्टॉपजवळ उभे असलेले आढळून आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 1,21,60,000/ (एक कोटी 21 लाख) रुपये किमतीचे एमडी हे ड्रग्ज आढळून आले.
ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आरोपाींनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : तू मला ओळखत नाही का, मी तळेगावचा भाई; म्हणत तरुणाचा चायनिज सेंटरवर कोयता घेऊन गोंधळ