(Pune Crime) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी जेजुरी येथून बेड्या ठोकल्या आहेत.
सचिन जगताप (वय ३९, रा. कोंढवे धावडे, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी परराज्यातील असून ती कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिचे विद्यापीठात काम होते. कोथरुड परिसरातून ती गुरुवारी (ता.१६) रिक्षाने विद्यापीठाच्या आवारात आली. सायंकाळी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यानंतर ती विद्यापीठाच्या आवारात रिक्षात थांबली. त्या ठिकाणी रिक्षाचालकाने तिच्याबर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तिने रिक्षाचालकाला विरोध केला आणि ती रिक्षातून बाहेर पडली. रिक्षाचालकाने युवतीला धमकावून तिचा मोबाइल क्रमांक घेतला. याप्रकरणी तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला जेजुरी येथून बेड्या ठोकल्या. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक ; गुन्हा दाखल..!