Pune Crime | पुणे : डाॅक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणाऱ्या झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येरवडा भागात गोळ्यांची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आसिफ अकबर शेख (वय १९, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आजारांवर डाॅक्टरांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या देण्यात येतात. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर झोप येते. येरवडा भागातील काहीजण या गोळ्यांचा वापर नशेसाठी करत असल्याची माहिती येरवडा पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस गोळ्यांची विक्री करणाऱ्याचा शोध घेत होते.
आरोपी शेख येरवडा भागात गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमजद शेख आणि अनिल शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शेखला पकडले. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची २२ पाकिटे जप्त केली. गोळ्यांच्या पाकिटांची किंमत २२०० रुपये आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime : बारामतीत २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..