पुणे : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत लग्नाबाबत विचारणा केल्यावर टाळाटाळ केल्या प्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१९ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोंढवा परिसरात हि घटना घडली आहे.
अविनाश हनुमंतराव नाईकवाडे (वय-३२ रा. वंडर स्कूलजवळ, गोकुळनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने याबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या ओळखत आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच महिलेसोबत संपर्क करणे बंद करुन तिची फसवणूक केली. आरोपी आपल्याला टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.