(Pune Crime) पुणे : मार्केटयार्ड व बिबवेवाड परिसरातील जुगार अड्ड्यांवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत तब्बल १७ जणांना पकडण्यात आले असून, ५२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तर, दोन स्वतंत्र गुन्हे देखील नोंद करण्यात आले आहेत.
याप्रकरणात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात १० जणांवर तर, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ७ जणांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई…!
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, तरीही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरूच आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाकडून यावर जोरदार कारवाई केली जात आहे. यादरम्यान, मार्केटयार्ड परिसरात रम्मी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार, पथकाने येथे छापा कारवाई केली. त्यावळी १० जणांना पकडले.
तर, बिबवेवाडीत कल्याण मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी ७ जणांना पकडण्यात आले. पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.