(Pune Crime) पुणे : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाजी मंडई परिसरात सुरू असणाऱ्या जुगार अड्यावर छापेमारी केली. या कारवाईत तब्बल १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात १६ जणांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, तरीही काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या आर्शिवादानेच अवैध धंदे सुरूच असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अवैध धंद्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जात आहे. यावेळी पथकाला वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात मटक्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव त्यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी १६ जण मटका खेळत व काहीजन घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.