( Pune Crime News ) पुणे : पुणे शहरात ( Pune Crime News )महिलेच्या मासिक पाळीच्या रक्ताची बातमी ताजी असताना वडिलांनी मुलीवर विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर वडिलांना दुसरा विवाह करावयाचा होता ,मात्र यास त्यांच्या 13 वर्षीय मुलीचा विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या आड येणाऱ्या मुलीचा वडिलांनी रागाच्या भरात विनयभंग केला आहे. मुलीच्या अंगाला स्पर्श करत त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून विनयभंग केला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही कर्वेनगरमधील आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे वडिल व आजीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या लग्नाच्या आड येणाऱ्या मुलीचा वडिलांनी केला विनयभंग…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्याआईचे निधन झाल्यानंतर वडिलांना दुसरे लग्न करायचे होते. परंतु फिर्यादी यांचा त्यास विरोध आहे. त्यामुळे दुसऱ्या लग्नाच्या आड येणाऱ्या मुलीचा वडिलांना राग होता. त्या रागातून फिर्यादीस विनाकारण शिवीगाळ करुन तसेच फिर्यादी घरात वावरत असताना फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करुन त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून विनयभंग केला.
तसेच फिर्यादीचे बहिणीसोबत ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची आजी विनाकारण फिर्यादी तिला मारहाण करते म्हणून फिर्यादीची बदनामी करण्याचा प्रयत्न करते,असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
देहूरोड येथे मायलेकीला मारहाण करून विनयभंग ; दोघांवर गुन्हा दाखल..!
महिलेचा विनयभंग करत पतीला दिली जीवे मारण्याची धमकी ; देहूरोड येथील घटना
कारमध्ये बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या