Pune Crime News | पुणे : शहरासह उपनगर भागात तसेच लगतच्या ग्रामीण भागात जमिनीच्या किमती गगना भिडल्या आहेत. जमिनीचे छोटे तुकटे पासून विक्री जोमात सुरु आहे. जमिन खरेदीच्या विक्रीमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. अशातच चक्क एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताचीच जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करुन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जमीन न देता केली फसवणूक…
भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगून ६० लाख रुपये घेऊन जमीन न देता फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तालाच धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भिती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता.
याबाबत सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियांका निलेश सूर्यवंशी (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका सूर्यवंशी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणती शेतजमीन खरेदी करुन दिली नाही. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले. आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली.
ते सहायक पोलीस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. या पोलीस अधिकार्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune | रसदार फळे महागली, फळांच्या भावात ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ
Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे
Bacchu Kadu News : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक