(Pune Crime News )पुणे : पुणे पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेला मोठा शस्त्रसाठा (large cache)पकडण्यात यश आले आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत वेगवेगळ्या सात सराईतांना पकडले असून, पोलीसांनी तब्बल १७ पिस्तूल तसेच १३ जिवंत काडतूसे जप्त केली आहे. मध्यप्रदेशातील एका डिलरला देखील प्रथमच पकडण्यात आले आहे.
हनुमंत अशोक गोल्हार (वय २४, रा. जवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रदिप विष्णू गायकवाड (वय २५), अरविंद श्रीराम पोटफोडे (वय ३८), शुभम विश्वनाथ गरजे (वय २५), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय २५), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय २५) आणि साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय २१, रा. सुसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेला मोठा शस्त्रसाठा पकडण्यात यश…
याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हेगारांची माहिती काढताना पोलिसांना हनुमंत गोल्हार याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानूसार, पथकाने त्याला पकडले. त्याच्या माहितीवरून इतर आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना पकडले गेले. त्यांच्या सर्वांकडून हे १७ पिस्तूल पकडले गेले आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.