Pune Crime News लोणी काळभोर, (पुणे) : ग्रामीण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चाराचाकी घोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चोरी गेलेल्या स्विफ्ट आणि डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर, तांबरम चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वार्टर वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चेन्नई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.
सदर घटनेचा तपास करित असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरी गेलेली वाहने तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात आहेत. या माहितीच्या आधारे शिरूर विभागाचे तपास पथक चैन्नई येथे पाठवून राजा कल्याण सुंदराम, रविंद्रम गोपीनाथम, यादवराज शक्तीवेल यांना ताब्यात घेवून एक डिझायर कार हस्तगत केली. त्यांचेकडे मिळून आलेली कार त्यांना आर सुधाकरण याने दिली होती.
दरम्यान, सुधाकरण याला शाहगढ जालना परीसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे तपास केला असता त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून त्याचेमार्फत तीन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली. यामध्ये ३० लाख रूपये किंमतीच्या चार कार असून त्यामध्ये दोन स्विफ्ट आणि दोन डिझायर कारचा समावेश आहे.