Pune Crime News पुणे : कामावरून घरी पतरणाऱ्या एका महिलेच्या खांद्यावर हात ठेवून एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाच्या सतर्कतेमुळे माथेफिरूच्या तावडीतून सोडवून सदर माथेफिरूला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर रस्त्यावर घडली.
याप्रकरणी राजा नेत्राम यादव (२२, नक्षत्र सोसायटी, पटवर्धन बाग, एरंडवणा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार…!
कर्वेनगर परिसरातील एका रुग्णालयामध्ये काम करणारी तरुणी तिचे काम संपवून घरी पायी निघाली होती. रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास पटवर्धन बाग या परिसरात पोहोचल्यावर अचानक मागून एका तरुणाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरली आणि आरडाओरड करायला लागली त्यावेळी त्याने तिचे तोंड दाबून तिला रस्त्यावर पाडले व तिच्यावर बळजबरी करायला लागला. त्यामुळे तिने आरडाओरड करायला सुरुवात केली.
दरम्यान, त्यावेळी त्या परिसरातील अभिषेक कांबळे त्यांच्या पत्नीसह निघाले होते. त्यांनी तरुणीचा आवाज ऐकून तिच्या मदतीसाठी धाव घेतली इतर व्यक्तीही जमा झाले. त्यांनी राजा यादव याला चोप देऊन जवळच असलेल्या अलंकार पोलिस ठाण्यामध्ये नेले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करिष्मा शेख करत आहेत.