(Pune Crime News ) पुणे : शहरात महिला अत्याचाऱ्यांराच्या घटनामध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मासिक पाळीच्या रक्ताची तस्करी करत अघोरी कृत केल्याची घटना ताजी असताना शहरातून बलात्काराची घटना समोर आली आहे. प्रेमाचा बहाणा करुन अल्पवयीन शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो व व्हिडिओ बनवून तिला सातत्याने ब्लॅकमेक बलात्कार केला. दरम्यान ही तरुणी बहाणा करुन वडिलांच्या घरी आल्यावर नांदण्यासाठी परत आली नाही तर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नागेश राजू चव्हाण (वय २३, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान फिर्यादी अल्पवयीन असताना घडला. सोलापूरला नेऊन च्यिाबरोबर मंदिरात लग्न केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश चव्हाण यांनी ओळख करुन फिर्यादी यांच्याशी प्रेम असल्याचे भासविले. तिला शितल लॉज येथे घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यावरुन तिला ब्लॅकमेल करुन वारंवार बलात्कार केला. २ फेब्रुवारी रोजी तो फिर्यादीला कॉलेजच्या बाहेर भेटायला आला व लग्न करण्याबाबत बोलू लागला. तेव्हा तिने नकार दिला. त्यावर त्याने फिनेल पिण्याचे नाटक केले. फिर्यादीला घेऊन तो सोलापूरला आला.
तेथे ३ फेब्रुवारी रोजी त्याने रुपा भवानी मंदिर येथे लग्न केले. त्यानंतर फिर्यादी बहाणा करुन त्याच्या तावडीतून निसटल्या व वडिलांच्या घरी परत आल्या.
त्यानंतर तिने नांदण्यासाठी यावे, असे तो म्हणू लागला. तिने नकार दिल्यावर नांदण्यासाठी परत आली नाही तर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यामुळे या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune crime News ; धुलीवंदनात टोळक्याची दहशत; तरुणाला अडवून बेदम मारहाण!
Pune News : आजीची चेन चोरणाऱ्या चोरट्याला नातीने दाखवला इंगा ; १० वर्षीय नातीचं सर्वत्र कौतुक..!