(Pune Crime News) पुणे : हडपसर भागात एका तडीपार गुंडाला पोलीसांनी पाठलाग करत पकडल्याची घटना समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या गुंड हा येरवडा पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केला होता. वानवडी पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
कृष्णासिंग उर्फ भुऱ्या भारतसिंग बावरी (वय २०, रा. पोते वस्ती, अशोकनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
बावरीला तडीपार केल्यानंतर तो शहरात फिरत होता. हडपसरमधील सातवनगर भागात तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या वानवडी पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पाठलाग करुन पकडले. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी बावरीला अटक करण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयवंत जाधव, व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी
Pune news : पुण्यात आज कालीचरण महाराजांची जाहीर सभा; कुठे होणार सभा जाणून घ्या!
Pune crime News – धुलीवंदनात टोळक्याची दहशत; तरुणाला अडवून बेदम मारहाण