(Pune Crime ) पुणे : तुझ्याकडे पाहून मृत्यु पावलेल्या पत्नीची आठवण होते असे सांगून एका ५० वर्षाच्या नराधमाने शेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
ताडीवाला रोड परिसरातील घटना…!
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये ताडीवाला रोड परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात. फिर्यादी यांची १२ वर्षाची मुलगी झोपली असताना आरोपी तिच्याजवळ गेला. तिच्याशी अश्लिल चाळे केले.
दरम्यान, ती ओरडली असता तिला शांत करुन तिला २० रुपये दिले. ‘‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई, लेकिन इसके बारे मे किसी को बताना मत,’’ असे म्हणाला. ही बाब या मुलीने आईला सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळ करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : कामवार ठेवलेल्या कामगाराकडूनच ग्राहक अन् मालकाची लाखोंची फसवणूक!
Pune Crime | पुणे : धक्कादायक! फोटो मॉर्फ करून अश्लील प्रोफाईल बनविले; आईसह मुलीचा विनयभंग!