(Pune Crime) पुणे : डीजे साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्येष्ठ नागरिकाने थेट सिस्टीम फोडून टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामध्ये वायर, मशीन, स्पीकर तोडून टाकत तब्बल १० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना कोंढवा खुर्द भागात बुधवारी (ता. ०८) संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यबीर बंगा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जेष्ठाचे नाव आहे. अब्दुल रिसालदार यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढवा खुर्द परिसरातील घटना…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोंढवा भागात असणाऱ्या कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी बॉलरूम मध्ये एक विवाह सोहळा संपन्न होत होता. विवाह समारंभ असल्यामुळे या ठिकाणी डीजे सिस्टीम लावण्यात आली होती. सत्यबीर बंगा यांचे घर या रिसॉर्ट पासून काही अंतरावर आहे. या लग्न समारंभात सुरू असलेल्या डीजे साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने बंगा यांनी थेट रिसॉर्ट मध्ये विनापरवानगी प्रवेश केला.
ज्या ठिकाणी समारंभ सुरू होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या वायर तोडून टाकल्या. इतकचं काय तर रागाच्या भरात त्यांनी एलईडी ऑपरेटरचा लॅपटॉप देखील फोडला आणि इतर सगळ्या वस्तूंचे नुकसान केले. या सगळ्या साऊंड सिस्टीमची किंमत जवळपास १० लाख रुपये होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune crime News – धुलीवंदनात टोळक्याची दहशत; तरुणाला अडवून बेदम मारहाण
Pune Crime News : घरफोडी ! लोहगावमधील बंद बंगला फोडला ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास