Pune Crime | भोर, (पुणे) : भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला वेळवंडी व नीरा नदीच्या संगमाजवळ बसलेल्या तरुणीचा तोल जाऊन धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमरास हि घटना घडली आहे. पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी निरगुडघर (ता. भोर) येथील तरुण आणि संबंधीत तरुणी खटाव (जि. सातारा) हे दोघे भाटघर धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पॉवर हाऊसच्या जवळ नदीच्या कडेला पाण्यात पाय सोडून दोघेही बसले होते. त्यावेळी मुलीचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली.
धरणातून पाणी सोडले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर गेली वाहून…
धरणातून पाणी सोडले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही. संबंधीत तरुणाने भोर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर दिली.
दरम्यान, भाटघर धरणाशेजारील घटनास्थळ हे शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळविले. त्यानंतर भोरचे पोलिस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur Crime : किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Nashik Crime | हृदयद्रावक..! नाशिकमध्ये उकळत्या तेलात भाजून सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत..!