Pune Crime | शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनी फोडून चोरट्यांनी तब्बल ७० हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
याप्रकरणी कंपनीचे एच आर मॅनेजर दिपक अशोक शिरसठ (वय ३३, रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत फिर्यादी दिपक शिरसठ हे एच आर मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जाते. या कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणून ठेवलेले असते.
गोडाऊनचे कुलूप तुटलेले…
दरम्यान, सदर कंपनीत असलेले सर्व साहित्य एका गोडाऊन मध्ये ठेवून एच आर मॅनेजर शिरसठ हे घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास काही कामगार कंपनीत आले असता, त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेले दिसून आले.
त्यानंतर कामगारांनी तातडीने ही बाब एच आर मॅनेजर दिपक शिरसठ यांना सांगितली. शिरसाठ यांनी कामगारांच्या मदतीने गोडाऊन मध्ये पाहणी केली असता कंपनीतील तब्बल सत्तर हजार रुपयांचे कलर व आदी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी दिपक शिरसठ यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल दांडगे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग ; तरूणाने नग्न होत केले असे काही
Pimpri-Chinchwad Crime : उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला जबर मारहाण; चिखलीतील प्रकार