(Pune Crime )पुणे : रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांनी दारूच्या नशेत ही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. रिक्षात बसल्यानंतर हटकल्यावरून त्यांनी नागरिकांत दहशत निर्माण व्हावी यासाठी तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे.
वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
पियुष राजेश मरोटे (२०), सिद्धार्थ अनिल काकडे (२१ दोघेही रा. वानवडी गाव, आदित्य सुनील पिवल (वय १९ रा. टीजे कॉलेज जवळ खडकी), हितेन रवींद्र यादव (वय १९ रा. कॅम्पस जवळ न्यू मोदीखाना कॅम्प) वानवडी पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली.
अभिजित दत्तात्रय बनकर ( वय ३० रा. खालची आळी, वानवडी गाव ) यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.
वानवडीतील शिवरकर दवाखान्यासमोर, खालची आळी आणि वरची आळी परिसरात शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला होता. यात दुचाकी २, रिक्षा ३, कार १, पॅगो टेम्पो १ अश्या ७ वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.