Pune Crime | पुणे : पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे वारंवार घडताना दिसून येत आहे. नाना पेठेत भरदिवसा तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत व्यापाराला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाना पेठेतील आझाद आळी मधून टू व्हीलर वरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून पैश्याने भरलेली पिशवी पळवली आहे. समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पैशाने भरलेली पिशवी घेऊन पसार…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकी वर जात असताना नाना पेठ येथील आजाद आळी मधून बाहेर येतात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी ही घेऊन ते दोघेही पसार झाले.
व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Railway News | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ;या’ गाड्या होणार पुन्हा रद्द
Pune News : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
Satara News : भाजपचे नेतृत्व छोट्या जातीकडे गेल्यामुळे क्रांतीचे चक्र पूर्ण : शिवाजीराव शिंदे