विशाल कदम
Pune Crime | पुणे : वारजे-माळवाडी येथे ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्याची घटना ताजी असतानाच, आता वानवडीतील एका मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दापाश करायला सामाजिक सुरक्षा विभागाला यश आले आहे. पोलिसांनी छापा टाकून ५ मुलींची सुटका केली आहे. तर स्पा मालकास अटक केली आहे.
श्रीधर मोहन साळुंखे (वय ४२, पवळे चौक कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. तर याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमानगर भागातील क्लिओज स्पा अँड सलून या ठिकाणी खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक…
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा पोलिसांना ५ महिला देहविक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने ५ महिलांची सुटका केली आणि स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीत अवैध देहविक्रीचे मोठे रॅकेट पुण्यात सुरू आहे. त्यामुळेच स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या स्पा सेंटरच्या आडून होत असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश पुणे पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Crime News | अतीक अहमदवर गोळी झाडणारे ; हल्लेखोर कोण होते?; का केली माफियांची हत्या?