(Pune Crime) पुणे : पुणे शहरातून संतापजनक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळेकरत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच मुलीची सावत्र आई घरकामासाठी त्रास द्यायची अन् वाईट-वाईट शिवीगाळ करायची. ही घटना शहरातील येरवडा भागात घडली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात पिडीत १७ वर्षीय ८ महिन्यांच्या मुलीने तक्रार दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी ३८ वर्षीय नराधम वडिलांना अटक केली आहे. तर, तिच्या सावत्र आईवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची महिला सावत्र आई आहे. ती वारंवार घरकामावरुन मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करीत असे. तर, दुसरीकडे वडिलच तिच्याबरोबर अश्लिल चाळे करीत असत. घरातील काम करताना अश्लील नजरेने ते पाहत. तर, अंगाशी झटून तिच्याशी चाळे करत होते. दरम्यान, मुलगी रास्ता पेठेतील तिच्या एका मैत्रिणीकडे आली होती.
त्यावेळी बोलताना तिने आई-वडिलांच्या वागणूकीबद्दल तिला सांगितले. त्यावेळी या मैत्रिणीने लागलीच तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले व याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोदंकरून वडिलांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pimpri Crime : भाजप नेत्याच्या मुलीची बावधन येथे गळफास घेऊन आत्महत्या..!
Pune Crime : कामवार ठेवलेल्या कामगाराकडूनच ग्राहक अन् मालकाची लाखोंची फसवणूक!