(Pune Crime ) शिक्रापूर : सोन्याच्या बिस्किटाची लालसा करणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून दोन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची धक्कादायक घटना शिक्रापूर (ता. शिरुर) Pune Crime येथील पाबळ चौकात घडली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी लक्ष्मी रघुनाथ गायकवाड (वय-७१ रा. खरपुडी ता. खेड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मी गायकवाड या शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात थांबल्या होत्या. तेव्हा गायकवाड यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आहे. त्यांनी गायकवाड यांना सांगितले की, आमच्याकडे सहा तोळे वजनाचे काही सोन्याचे बिस्कीट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला १ लाख रुपये द्या. नाहीतर तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र द्या, असे म्हणून गायकवाड यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे मंगळसूत्र घेतले. आणि गायकवाड यांना १ सोन्याचे बिस्कीट दिले आणि दोघेजण तेथून निघून गेले.
दरम्यान, फिर्यादी लक्ष्मी गायकवाड यांना सदर बिस्कीट वजनाला जास्त वाटू लागले. त्यांनी बिस्कीट नीट पहिले असता, त्यांना ते बनावट असल्याचे लक्षात आले. गायकवाड यांना आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी लक्ष्मी गायकवाड यांनी दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे करीत आहे आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime News : धडाकेबाज कारवाई : तडीपार गुंडाला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले!
Pune Crime News : पुण्यात मोठा शस्त्रसाठा पकडला; १७ पिस्तूले व १३ जिवंत काडतूसे जप्त!