Pune Crime | पुणे : पुण्यातल्या एका शाळेत चक्क चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (School in Pune used for terrorist activities)
शाळेचे दोन मजले सील…
ब्लू बेल नावाच्या शाळेत दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होतं. रविवारी एनआयएने या शाळेचे दोन मजले सील केले. मुस्लीम तरूणांना गळाला लावून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देण्य़ासाठी या शाळेचा वापर केला जात होता असं तपासात उघड झालंय. त्यानंतर तातडीने कारवाई करत यूएपीए कायद्याअंतर्गत एनआयएने या शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला.
या शाळेत शस्त्रप्रशिक्षण आणि हल्ला करण्याचं ट्रेनिंग पीएफआयकडून दिलं जात होतं अशी माहिती मिळाली आहे. देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा ठपका NIA ठेवला आहे. २२ सप्टेंबर २०२२ ला या शाळेवरही छापे टाकण्यात आले होते.
NIA ATTACHES 2 FLOORS OF PUNE SCHOOL BUILDING USED BY THE PFI AS TRAINING CENTRE pic.twitter.com/uXo61v067O
— NIA India (@NIA_India) April 17, 2023
दरम्यान, २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचं पीएफआयचं लक्ष्य आहे. NIA ने गेल्यावर्षी देशभर पीएफआयच्या तळांवर छापे मारले होते. मोठ्या प्रमाणात देशभर अटकसत्र झालं होतं. त्याचवेळी पुण्यातही या शाळेवर छापा मारला होता. त्यानंतर या शाळेत नेमकं सुरू काय होतं याचा शोध घेतला गेला. आता एनआयएने या शाळेचे दोन मजले सील केलेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : मित्राचा मित्र सारखा घरी येतो म्हणन चाकूने केला हल्ला, वाल्हेकरवाडीतील घटना