पुणे – Pune Crime : फसवणूक तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांवर कोंढवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील बांधकाम व्यावसायिकाच्या चालु असणाऱ्या बांधकामावर कारवाई करण्याची धमकी देत तब्बल 51 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय साडेतीन लाख रुपयांची खंडणी घेतल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Pune Crime)
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी कोंढवा येथील 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शफी पठाण आणि समीर पठाण (रा. पारगेनगर, कोंढवा खु. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसाईक आहेत. त्यांचे कोंढबा भागात बांधकाम चालु आहे. दरम्यान सन 2017 पासुन आजपर्यंत तक्रारदार यांच्या बांधकाम साईटवर वेळावेळी जावून बांधकाम विभाग तसेच महसुल विभागातर्फे कारवाई करण्याची धमकी दिली व वेळावेळी तक्रारदाय यांच्याकडून पैसे उकळडे. याशिवाय आरोपीने स्वतःचा वाढदिवस आणि महिला दिनी साडी वाटप कार्यक्रमासाठी तसेच जमीन खरेदीसाठी पैसे घेतले. तर आरोपी समीर पठाणने पत्नीस पोटगी देण्यासाठी रोख रक्कम घेतली.
तक्रारदार यास महानगरपालिकेच्या विविध परवानग्या काढून देतो असे सांगत, शासकीय नियमानुसार बांधकाम करून नियमीत करणेसाठी 40 लाख रूपये मागुन तक्रारदाराचे बांधकाम नियमीत न करता त्यांच्याकडून घेतलेली रक्कम स्वतःसाठी इनोव्हा गाडी घेण्यासाठी वापरली. अशी एकुण 51 लाख 50 हजार रूपये घेवून त्यांची फसवणूक केली तसेच आणखी 3 लाख 50 हजार रूपये मागितले. नाही दिले तर बांधकाम करू देणार नाही अशी धमकी दिली. यानंतर मात्र व्यावसायिकाने पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
Fraud News | पिंपरी-चिंचवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात; पाच लाखाला गंडा…!
Pune Fraud News | पुणे : विजय वर्ल्डच्या मालकावर फसवणूकीचा गुन्हा; १८ लाखांच्या फसवणूकीचा आरोप…!