Pune Crime | पुणे : व्हॉट्सअपवर चॅटींग करण्याचे वेड बरे नव्हे असे म्हटले जाते. कारण यावरुन केलेल्या मेसेजिंगवरुन अनेकांना बरे वाईट अनुभव आलेले आहेत. असे असताना व्हॉट्सअपवरील चॅटींगमधून ओळख झाली.
त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून विश्वास संपादन करत नोकरी, कॅन्सरवरील उपचारसाठी, प्रवासासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून एका महिलेची तब्बल 38 लाख 48 हजार 609 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
चिखली पोलीस ठाण्यात तक्रार…
याबाबत एका 45 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर शाहीर पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल 2020 ते 24 मार्च 2023 या कालावधीत चिखली येथील शरदनगरमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीरने तक्रारदार महिलेसोबत व्हॉट्सअपद्वारे ओळख निर्माण केली. महिलेचा विश्वास संपादन करुन, त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर नोकरीचे कारण सांगून तसेच त्याला झालेल्या कॅन्सरच्या उपचारासाठी, लोन करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून ऑनलाईन पद्धतीने तब्बल 38 लाख 48 हजार 609 रुपये घेतले.
महिलेने पैसे परत मागितले तर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली तसेच आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pimpri Chinchwad Crime : आरोपीने पोलीसांनाच मारहाण करत घेतला चावा; पिंगळेसौदागर मधील प्रकार
Nagar Crime | नगर : त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांची धडक कारवाई
Pune Crime | धक्कादायक : हाय होल्टेजच्या वायरने लागली रूमला भीषण आग; आगीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू