Pune Crime | पुणे : एका दारुड्या महिलेने हॉटेलमध्ये धिंगाणा घालून प्रत्येकाच्या जेवणात पाणी ओतल्याची धक्कादायक घटना मार्केट यार्ड परीसरातील श्री सागर हॉटेलात शुक्रवारी (ता.२१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात गोंधळ घालून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचाही चावा घेतला आहे.
याप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसा,र श्री सागर हॉटेलात या महिलेला जेवणात गरमागरम भाकरी न मिळाल्याने तिने अक्षरश: संपूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले. दारुच्या नशेत या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना शिव्या घालायला सुरूवात केली. महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला असता तिने आपल्याला भाकरी का नाही दिली असा धोशा लावत हॉटेलात जेवत असलेल्या इतरांच्या ताटात भाकरी बघून त्यांच्या ताटात थेट पाणीच ओतले.
मार्केटयार्ड परीसरातील घटना…
त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरनी या महिलेची शंभर नंबरवर तक्रार केली. पोलीसांनी हॉटेलमध्ये येत या महिलेची कशीबशी मनधरणी करीत तिला हॉटेलातून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात ठाण्यात नेले. या दारूड्या महिलेला जीपमधून नेले तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, संबंधित दारुड्या महिलेने हॉटेलपेक्षाही मोठा राडा पोलीस ठाण्यात घातला. दारुड्या महिलेने महिला पोलिसाच्या नेमवरील नाव वाचून मी कोण आहे, ते तुला दाखवतेच असे म्हणून तिची नेमप्लेटच ओढली. तसेच शिवीगाळ करीत महिला पोलिसांनाच मारहाण केली.
तिला पकडायला आलेल्या महिला शिपायाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. पोलिसांनी दारुड्या महिलेला अटक केली आहे. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Good News : पुणे ठरले राज्यातील पहिलं तर देशातील दुसरं ‘हरित शहर