पुणे: फ्लॅट खरेदीत महिलेची तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना हिंजवडी (पुणे) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास लुंकड, मिलींद लुंकड, संजय लुंकड, दीपक भटेवरा, मयूर पाटील, राजीव गंभीर, प्रशांत गाढवे, विजय मुरकुटे, व्यवस्थापक काळे आणि दोन महिला, एक अनोळखी पेंटर व एक अनोळखी दुचाकीस्वार अशी एकूण १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला आरोपींनी बनावट नकाशा तयार करून फ्लॅटखरेदीत १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तर याबाबत तक्रारदार यांनी जाब विचारला असता, त्यातील दोन आरोपींनी सदर तक्रारदार महिलेचा विनयभंग केला.
दरम्यान, याप्रकरणी महिलेनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खारगे करीत आहेत.