(Pune Crime) पुणे : मुलीचा शाही विवाहा लावून दिल्यानंतर आपली मुलगी सुखात राहिला असा विश्वास तिच्या आई वडिलांना होता. अलिबाग येथे ५० हजार अमेरिकन डॉलरचा हुंडा अन ७५ लाख रुपये खर्च करून प्रेमविवाह अलिबागमध्ये मोठ्या थाटात पार संपन्न झाला. मुलीच्या पतीने तिला अमेरिकेत बोलावून घेतले. तिच्यावर धर्मांतराचा दबाव टाकून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेवटी तरुणीने अमेरिकन पोलिसांच्या मदतीने स्व: तची सुटका करुन घेतली. त्यानंतर पुण्यात आल्यावर विवाहितेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या विवाहितेने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अरुण वर्मा , परविन अरुण वर्मा , पती-लव वर्मा , दीर -कुश वर्मा (सर्व रा. खारघर, मुंबई) नणंद-विधु वर्मा आणि नणंदेचा पती डॅनियल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार हा नवी मुंबईतील खारघर व अमेरिकेत १ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.
दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह…!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लव वर्मा यांच्याबरोबर प्रेम संबंध होते. त्यानंतर त्यांनी दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह केला. या लग्नासाठी ७५ लाख रुपये खर्च केले. तसेच हुंडा म्हणून ५० हजार डॉलर देण्यात आले. तसेच लग्नात पती लव वर्मा यांच्या आईस व दोन बहिणीना प्रत्येकी ५ तोळ्यांचा सोन्याचा हार देण्यात आला. दरम्यान फिर्यादीच्या पतीचा जुळा भाऊ कुश हा लग्नामध्ये सर्वासमोर ही माझी हाफ वाईफ आहे, असे बोलत होता.
लग्नाच्या सप्तपदी सुरु असताना नणंदेच्या पतीने तू खिश्चन धर्म स्वीकार असे सांगितले. त्यावेळी विवाहितेने त्यास नकार दिला. त्यानंतर नणंद व तिचा पती मारहाण करून छळ करीत होते. तसेच पतीही शिवीगाळ करु लागल्याने ती माहेरी पुण्यात निघून आली. काही दिवसानंतर तिचा पती अमेरिकेला निघून गेला. आमच्या घरात पाऊल ठेवू नकोस, अमेरिकेत आली तर तुझे पाय तोडून टाकेल, हे लग्न मोडले आहे, असे सांगितले.
दरम्यान, साखरपुड्यावेळी पतीचा जुळा भाऊ कुश याने केलेल्या कृत्याबाबत विवाहितेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी असे पती लव वर्माने सांगितले. तु अमेरिकेत ये, आपण आपले लग्न टिकवूया असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला गेली. तेथे पोहचताच पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्या भावाविरोधात दिलेली तक्रार अगोदर मागे घे. तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून तिला जेवण देणे बंद केले.
शेवटी तिने अमेरिकेतील पोलिसांना ९११ वर कॉल करुन मदत मागितली. पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. सध्या तो जामिनावर आहे. तिचे वडिल अमेरिकेला गेले. तिला पुण्यात आणल्यानंतर आता त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासरकडील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण