पुणे : पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीन वर्षाच्या मुलीसमोर डोक्यात फरशी घालून खून केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली आहे.
रमेश पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. तर ललिता पुजारी अस खून झालेल्या महिलेचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व ललिता पुजारी यांना तीन मुलं आहेत. त्यातच रमेशला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्या मुलांच्या समोर दररोज दारू पिऊन ललिताला मारहाण करायचा. त्यामुळे त्याचा पाच वर्षीय मुलगा, नऊ वर्षीय मुलगी त्यांच्या सोबत राहात होती. तर, तिसरी मुलगी हॉस्टेलला राहते.
दरम्यान, रात्री उशिरा पती- पत्नीमध्ये वाद झाला. रमेशचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याचा राग अनावर झाला आणि क्षणाचा ही विचार न करता त्याने ललिताच्या डोक्यात फरशी घातली. गंभीर जखमी झालेली ललिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपी रमेश पुजारीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.