(Pune Crime) पुणे : पेप्सीको कंपनीच्या डिलर शिपमध्ये पार्टनरशिप देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खडकी मार्केट यार्ड येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाणेर पोलीसांनी घेतले ताब्यात…!
संतोष चिंचवडे असे आरोपीचे नाव असून बाणेर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
एक वर्षपूर्वी संतोष चिंचवडे, त्याची बायको रोषणा संतोष चिंचवडे आणि त्यांच्या कंपनीतील व्यवस्थापक अर्चना जगताप यांच्या विरुद्ध रमेश गायकवाड, जयंत लिमये, सदाशिव कुलकर्णी, प्रतीक राणवाडे, बबन रासकर, युवराज धनकुडे यांनी 14 मार्च 2022 रोजी 2 कोटी हून अधिक रुपयांची फसवणुकीचा गुन्हा सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष एक वर्षापासून फरार होता. या आरोपींनी 5 एप्रिल 2022 रोजी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी यांनी उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, यामध्ये व्यवस्थापक आरोपी अर्चना जगतापला जामीन मिळाला. परंतु रोषणा चिंचवडे आणि संतोष चिंचवडे यांना जामीन फेटाळण्यात आला होता. उलटपक्षी अंत्रिम जामिन देण्यासारखी केस नाही असे निरीक्षण नोंदवल होते. मात्र संतष फरार होता. अखेर एक वर्षानी त्याला फडण्यात पोलिसांना यश आले. चिंचवडे याला एपीआय निकम यांच्या तपास पथकाने अटक केली, अशी माहिती निकम यांनी दिली.