पुणे : लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद, व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गणेश अरुण राऊत, (वय- ३४ रा. राऊत वस्ती, पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) धनाजी नागनाथ लोकरे, वय-३७, रा. लवूळ ता. माढा, जि. सोलापूर, आबा दत्तात्रय डोके वय-२४, रा. टेकळे वस्ती, पेनुर, ता. मोहोळ) समाधान उर्फ माऊली शिवाजी चौरे, वय-३२, रा. तामडाग वस्ती, पेनुर, ता. मोहोळ जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख १३ हजार ८६९ रुपयांची ५ वाहने जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार चोरीस आळा घालणे करिता कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे, संदीप येळे व राहुल इंगळे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की वरील आरोपींकडे असलेलेली चारचाकी गाडी व ट्रक्टर हि वृंदावन मंगल कार्यालय थेऊर (ता. हवेली) येथे वाहनाचा नंबर खोडलेला ट्रॅक्टर व नंबर प्लेट नसलेली चारचाकी गाडी संशयितरित्या मिळून आली. सदर आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या कब्जात मिळून आलेली वाहने हि कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली माहिती मिळाली. त्यांना दाकःल गुन्ह्यात अटक करून पुढील तपस केला असता या गुन्ह्यात त्याचा आणखी एक साथीदार आरोपी समाधान उर्फ माऊली चौरे यालाही पोलिसांनी शोध घेऊन अटक केली आहे.
दरम्यान, सदर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता चा आणखी एक साथीदार आरोपी विजय बोरवडे राह. बीड याने वाहने चोरी करणेकरीता सॅन्ट्रो कार वरील आरोपींना देऊन वरील प्रमाणे वाहने पुणे शहरातुन चोरी करून आरोपी विजय बोरवडे रा. बीड याचे बीड येथील साईनाथ मोटर्स दुकानावरती विकणेसाठी देत होता अशी माहिती मिळाली. त्याच्याकडे ३ चारचाकी वाहने गणेश राऊत याने कबुली दिली. तसेच वाहने चोरी करण्यासाठी रेकी करणारा त्यांचा साथीदार आरोपी अक्षय उर्फ भैय्या चव्हाण, रा. हडपसर, पुणे हा चोरीचे वाहनाचे व ठिकाणाची रेकी करून तशी माहिती आरोपींना देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख १३ हजार ८६९ रुपयांची ५ वाहने जप्त केली आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी व पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे,अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाने, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे,राहुल इंगळे, संदीप इंगळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केलेली आहे.