Pune Child Marrige पुणे, ता. 12 : बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतानाही पुण्यासारख्या प्रगत शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालेवाडी परिसरात १० मे रोजी पार पडलेल्या या विवाहप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. Pune Child Marrige

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहातील नवरीचे वय अवघे १५ वर्ष असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. मुलीचे लग्न लवकर व्हावे, या कुटुंबीयांच्या आग्रहातून हा विवाह लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित मुलगा ग्रामीण भागातील असून शेतीचे काम करतो. मात्र, अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवरही कारवाई करण्यात आली आहे. Pune Child Marrige

दरम्यान, बालेवाडी परिसरात विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. तक्रार मिळताच बाणेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नवरा-नवरीचे वय तपासले असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी मुलीचे आई-वडील, मुलाचे आई-वडील तसेच विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. Pune Child Marrige

बालविवाहासारखा गंभीर प्रकार पुण्यात घडल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत अजूनही समाजात पुरेशी जनजागृती झालेली नसल्याचे या घटनेतून समोर आल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करत असून, एवढ्या कमी वयात विवाह लावण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. Pune Child Marrige






