(Pune Big Crime News ) पुणे : आयटी अभियंता असलेल्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची व ८ वर्षीय मुलाची पॉलिथीन बॅगने दाबून हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी (ता. १५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास औंध परिसरात ही घटना घडली आहे. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास चतु:र्श्रुंगी पोलिस करीत आहेत.
टीसीएस कंपनीमध्ये कामाला…!
सुदीप्तो गांगुली (वय ४४, रा. औंध मूळ पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये सुदीप्तो गांगुली हा त्याच्या पत्नी व मुलासह राहत होता. तो टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. ३ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याने पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतु:र्श्रुंगी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित!
Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण!